औरंगाबाद- औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील पेडापूर फाटा येथील इंडियन धाब्यासमोर समोरून आलेल्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही घटना बुधवारी दि. २१ मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली असून अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश भाऊसाहेब शिंदे, महेश लंगडे हे दोघे तरुण वडगाव कोल्हाटी येथील रहीवाशी असून. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश आणि महेश दुचाकीवरून वडगाव येथून शिर्डीला जाण्यासाठी रात्री दहा वाजता निघाले होते. अहमदनगर महामार्गावरून जात असताना पेडापूर फाटा येथील इंडियन धाब्यासमोर समोरून येणाऱ्या ट्रक ने त्यांना धडक दिली. अपघातात गणेश ला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर महेश गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती इंडियन ढाब्यावर असलेल्या लोकांना कळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले. नागरिकांनी गंगापूर पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी रस्त्याच्या कडेला केली. अपघातामुळे अहमदनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
नेहमी जायचे शिर्डीला
गणेश व महेश हे दर्शनासाठी नेहमीच शिर्डीला जात असत. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री दुचाकीवरून शिर्डीला दर्शनासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामुळे वडगाव कोल्हाटी वर शोककळा पसरली आहे.










